ब्रिगेडियर सुधीर सावंत; राज्याभिषेकोत्सवाला ३५० वर्षानिमित्त कार्यक्रम
⚡सावंतवाडी ता.०२-: शालेय जीवनात चौथीनंतर छत्रपतींचा इतिहास कोणीच आठवत नाही, इतिहास विसरलो तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करताना कठीण होईल म्हणून छत्रपतींचा खरा इतिहास जनतेसमोर यावा म्हणून चौथीच्या पुढेही छत्रपतींचा इतिहास अभ्यास रूपात आणावा यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रयत्न करावेत असे मत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज येथे व्यक्त केले.
तर प्रत्येक पाल्याने आपल्या मुलांना सैन्य काय आहे हे दाखवले पाहिजे येणाऱ्या काळात सैनिक स्कूलच्या माध्यमातून मुलींना सैन्यात पाठवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही ब्रिगेडियर श्री सावंत म्हणाले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकोत्सवाला 350 वर्ष प्रारंभ होत असल्यामुळे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली व कृषी महाविद्यालय,ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्रिगेडियर श्री सावंत बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर सावंतवाडी संस्थांचे युवराज लखन सावंत भोसले शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ राजेश पराडकर अशोक दळवी शशिकांत गावडे चंद्रकांत शिरसाट पि.टी परब, सैनिक स्कूलचे श्री गावडे, दीपक राऊळ,विलास सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रिगेडियर श्री सावंत म्हणाले, संपूर्ण देशात राज्य करणारे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केल. हा त्यांचा खरा इतिहास तरुण पिढीला येत नाही हे दुर्दैव आहे शिक्षणामध्ये चौथीपर्यंतच इतिहास शिकवला जातो त्यानंतर छत्रपती कोणालाच आठवत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शासनाच्या शालेय विभागाकडून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चौथी नंतर सुद्धा छत्रपतींचा इतिहास पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांसमोर यावा यासाठी प्रयत्न करावेत. सैन्यात काम करणे म्हणजे नोकरी नव्हे तर त्याला प्रचंड त्या करावा लागतो युद्धगर्जनेमध्ये शत्रूच्या मीटर जवळ असताना छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष केला जातो यामुळे सैन्यामध्ये एक नवी चेतना ऊर्जा निर्माण होते आज खऱ्या अर्थाने सैन्याला दहशतवादांशी लढावे लागत आहे दुसरीकडे ड्रग्स सारखी कीड देशाला लागली आहे याला मुख्य कारण म्हणजे ड्रग्स माफियांच्या हातात राजकीय अस्त्र आहे सैन्यात काम करत असताना या ड्र्क्स माफीयांच्या विरोधातही आपण लढलो फार त्रास झाला मात्र मागे हटलो नाही त्यामुळे प्रत्येक पाल्याने एकदा तरी आपल्या मुलांना सैन्य काय असते हे दाखवणे गरजेचे आहे ठिकाणी आपण सैनिक स्कूल आणि सैनिक पतसंस्था अशी दोन रोपटी लावली होती त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे भविष्यात मुलींना सैन्यात पाठवण्या साठी आवश्यक असलेले ट्रेनिंग सैनिक स्कूलच्या माध्यमातूनही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी कृषी विद्यालयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात चळवळ उभी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ब्रिगेडियर श्री सावंत यांनी लिहिलेल्या थर्ड आय या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थांचे युवराज लखम सावंत भोसले यांनीही उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित पोवाडा सोनुर्ली येथील मुकुंद परब ग्रुपच्या माध्यमातून सादर करण्यात आला दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
