सैनिक स्कूल, कृषी महाविद्यालयाचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.३०-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकोत्सवाला ३५० वर्ष प्रारंभ होत असल्यामुळे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली व कृषी महाविद्यालय, ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ०२ जून २म रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता हॉटेल पर्ल, (मँगो २) जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळ, सावंतवाडी येथे राज्यभिषेकानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. नाम. दिपकभाई केसरकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, पालकमंत्री कोल्हापूर, मा. लखमराजे भोसले, सावंतवाडी व ब्रिगेडिअर सुधीरजी सावंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ब्रिगेडिअर सुधीरजी सावंत लिखित “थर्ड आय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा, व्याख्यान, देखावा, गीत सादरीकरण व मान्यवरांचे मनोगत असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
