आठवडा बाजारात दोन व्यापारी युवकात जागेवरुन फ्रि स्टाईल…

सावंतवाडी
येथील आठवडा बाजारात सायकांळी जागेवरुन दोन व्यापारी युवकांमध्ये फ्री स्टाईल झाली. यामुळे नव्या जागेत अपुऱ्या जागेचा मुद्दा पुढे आला असून पालिकेच्या कर्मचारी परवीन शेख आणि हाॅकर्स संघटनेचे अध्यक्ष अजय जाधव यांनी दोघात मध्यस्थी करत वादावर तोडगा काढला.
सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर भरवला जाणारा आठवडा बाजार अलीकडेच शासकीय गोडाऊन परिसरात घालवण्यात आला आहे या ठिकाणी पालिकेकडून व्यापाऱ्यांसाठी जागेचे आरक्षण निश्चित करत व्यापाऱ्यांना बसवण्यात आले आहे मात्र आज बाजारासाठी आलेल्या दोन युवकांमध्ये सायंकाळी जागेवरून वाद उफाळून आला गोडाऊन समोरून जागेत दुकान लावण्यावरून हा वाद झाला मुळात या ठिकाणी गोडाऊन साठी येणाऱ्या गाड्या लावण्यासाठी जागा सोडण्यात आली असतानाही व्यापाऱ्यांना बसवले जाते आज हा प्रकार प्रकर्षाने समोर आला या ठिकाणी कुठलीही जागा न सोडता व्यापाऱ्यांनी आपले दुकाने मांडले होते त्याच्या बाजूला अन्य एकाने दुकान लावण्यास घेतले असता निर्माण झाला यातून दोघेही एकमेकांना चांगले भिडले हा प्रकार पालिकेचे कर्मचारी परवीन शेख व ऑफर्स संघटनेचे अध्यक्ष श्री जाधव यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात वस्तुस्थिती जाणून घेतली शिवाय ज्यांनी गोडाऊन समोर दुकान मांडली होती त्यांना बाजूला करून जागा मोकळी करण्यात आली तसेच वाद निर्माण झालेल्या दोघांनाही जागा उपलब्ध करून देण्यात आली. दरम्यान झालेला हा प्रकर समजून झाला आहे यावर तोडगा काढण्यात आल्याचे परविन शेख व श्री जाधव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page