⚡कणकवली ता.३०-: स्व. विजयराव विष्णू नाईक यांचा आठवा स्मृतिदिन शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचे चिरंजीव कुडाळ मालवणचे आ.वैभव नाईक व उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. विजयभाऊंचे सहकारी संजय पारकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला.
आ. वैभव नाईक म्हणाले, सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणार्या विजयराव नाईक यांच्या स्मृती आजही सर्वांच्या स्मरणात आहेत.त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात फार मोठ्या आदराची भावना आहे. त्यांनी समाजसेवेचा जो आदर्श घालून दिला, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या कामाचा वारसा जपण्याच्या प्रयत्न आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले. दरम्यान कणकवली विजय भवन येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनीही विजय भाऊंना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संजय पारकर, युवक कल्याण संघ सचिव रमन बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य डॉ. जगताप, नितीन राऊळ, बाबी गुरव,अरुण परब सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
