ब्रिगेडियर सुधीर सावंत:४ जून रोजी करणार शुभारंभ
⚡ओरोस ता.२२-: २०२३-२४ हे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष म्हणून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरे केले जाणार आहे. महाराजांची किर्ती देशातच नव्हे तर जगभर आहे. येत्या ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. महाराज शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांनी वनांच्या संवर्धनाचे महत्व जाणले होते.
शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, कृषि विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय यांचे वतीने यावर्षी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. ४ जून रोजी याचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडियर सावंत बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान सचिव शांताराम रावराणे, राजू रावराणे, प्रा विलास सावंत, प्रा विवेक राणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ, प्राध्यापक उपस्थित होते.
