⚡मालवण ता.०६-: कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी वर्ष पूर्ततेच्या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांच्याहस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रशालेचे शिक्षक पी. के. राणे आणि डी. डी. जाधव यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगून त्यांच्या लोकाभिमुख कार्याची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनाच्या कार्यक्रमानंतर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप करण्यात आले.
