⚡मालवण ता.०५-: तोंडवळी येथील ब्राह्मणदेव मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ७ मे रोजी तेथील सापळेबाग येथे सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. यानिमित्त स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ, महिला व मुलांच्या विविध स्पर्धा, वाडीतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व इतर कार्यक्रम आयोजित केले आहेत.
तसेच रात्री १० वा. बुवा संदीप पुजारे (पखवाज-मंजिल काळसेकर, तबला-विनायक मेस्त्री) व बुवा गुंडू सावंत (पखवाज-विराज बावकर, तबला – सागर कदम) यांच्यात डबलबारी भजन सामना होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
