⚡मालवण ता.०३-:
वायंगणी येथील सडयेवाडी विकास मंडळातर्फे ४ मे रोजी मंडळाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुष रंगमंच सडयेवाडी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती व तीर्थप्रसाद, १ वा. महाप्रसाद, ३ वा. वर्धापन दिनानिमित्त मेळावा, मान्यवरांचा सत्कार, शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार, हळदीकुंकू कार्यक्रम, रात्री १० वा. ‘खुनाला वाचा फुटली’ हे सामाजिक रहस्यमय नाटक होईल. ६ रोजी सडयेवाडीतील मुलामुलींचे नृत्याचे कार्यक्रम होतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश सावंत, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार वैभव नाईक, प्रमुख अतिथी म्हणून पं. स. माजी सदस्य उदय दुखंडे, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, उपसरपंच समृद्धी आसोलकर, पोलीस पाटील सुनील त्रिंबककर आदी उपस्थित राहणार आहेत.
