⚡मालवण ता.०३-: आंबडोस येथील देव रवळनाथ मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ५ व ६ मे रोजी रवळनाथ मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ रोजी सकाळी ९ वा. शिवशक्ती याग व धार्मिक विधी, दुपारी १ व सायंकाळी ७ वा. महाआरती, ७.३० वा. भजन, रात्री ८ वा. ज्ञानदेव मेस्त्री, ओरोस यांचे भजन, ९.३० वा. ओम येरम, पोईप यांचे भजन. ६ रोजी शिवशक्ती याग व धार्मिक विधी, दुपारी १ वाजता महाआरती, महाप्रसाद, ४ वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वा. महाआरती, ७ वा. भजने, रात्री ९ वा. पालखी प्रदक्षिणा, १० वा. गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ, हळवल यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देव रवळनाथ मंदिरचा मानकरी वर्ग व आंबडोस ग्रामस्थांनी केले आहे.
आंबडोस येथे ५ व ६ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
