कांदळगाव येथे १२ मेपासून ‘बुद्धिस्ट फेस्टिवल’चे आयोजन

⚡मालवण ता.०३-: कांदळगाव सम्राट अशोक नगर येथील बुद्धविहार येथे सिध्दार्थ विकास मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रमानिमित्त ‘बुद्धिस्ट फेस्टिवल २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १२ ते १४ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे रेलचेल असणार आहे.

१२ रोजी सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहण व बुद्ध पूजापाठ, १०.३० ते दुपारी १ या वेळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तकांचे १३२ मिनिटे वाचन, दुपारी २ वाजता लहान मुलांसाठी फनीगेम्स स्पर्धा, सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा, रात्री ८ वाजता सामुदायिक भोजन, ९.३०- बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम. १३ रोजी सकाळी १० वाजता त्रिसरण पंचशील,
सकाळी ११ वाजता व्याख्यान, दुपारी २ वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ५.३० वाजता धम्मरॅली, रात्री १० वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे.

१४ रोजी सकाळी १० वाजता बुद्ध पूजापाठ, ११ वाजता संविधानवर आधारीत प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि २२ प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा.सायंकाळी ५ वाजता अभिवादन सभा, रात्री ८.३० वाजता सामुदायिक भोजन, १० वाजता ‘जल्लोष कदमांचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन सिद्धार्थ विकास मंडळ, यशोधरा महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page