⚡मालवण ता.०३-:
कांदळगाव सम्राट अशोक नगर येथील
बुद्धविहार येथे सिद्धार्थ विकास मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमानिमित्त ‘बुद्धिस्ट फेस्टिवल २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात १३ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना ७ हजार १३५, ५ हजार १३५, ३ हजार १३५ रुपये तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी १ हजार ६३२ रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी सोनिया संदीप कदम (९४२०७६१३१३), उदय कदम (९४०३५५७३८२) या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
