कणकवली न.पं.ला प्राप्त होणार ८९ लाखांचा अद्ययावत अग्निशामक बंब

अग्निशामक दलाच्या केंद्र जमिनीच्या भूसंपादनासाठी ४ कोटी ७० लाख

⚡कणकवली ता.०३-: कणकवली नगर पंचायतीला लवकरच नवीन अग्निशमन बंब प्राप्त होणार असून यासाठी ८९ लाख ९२ हजाराच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या केंद्रासाठी जमिनीच्या भूसंपादनासाठी ४ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.भविष्यात कणकवलीत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी मदत होईल,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,संजय कामतेकर,मेघा गांगण,विराज भोसले,महेश सावंत,किशोर राणे,अजय गांगण आदी उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायतने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जुना अग्निशामक बंब निर्लेखित केला होता.त्यानंतर नगरपंचायतीने सरकारकडे नवीन अग्निशामक बंब खरेदीचा प्रस्ताव केला होता.नवीन अद्यावत बंबसाठी ८९ .९२ लाखांचा निधी लागणार आहे .त्याला चेस अशोक लेलँड कंपनीची घेत आहोत.त्याची वर्क ऑर्डर आम्ही दिली आहे.येत्या दीड ते दोन महिन्यात बॉडी बांधून आपल्याला मिळणार आहे.वजन १९ टन आणि ६ हजार लिटर पाणी आणि १ हजार फोम् असणार आहे.इंजिन पॉवर १८० एचपी, शिडीची लांबी १०.५ मीटर आहे.गाडीच्या केबिनमध्ये चालक अधिक ४ कर्मचारी बसण्याची व्यवस्था आहे.या बंबला पाणी फवारणी २००० लिटर प्रती मिनीट आहे.प्रथोमोपाचार पेटी १० माणसांकरीताआहे,असे समीर नलावडे यांनी सांगितले.

कणकवली अग्निशामक केंद्र २४ तास चालवण्यासाठी जागा भूसंपादन प्रस्ताव केला आहे. भूसंपादन अधिकारी लवकरच संबंधित जमीन मालकांना त्याचे वाटप करणार आहेत.त्यासाठी नगरपंचायतने ४ कोटी ७० लाख दिले आहेत.तेथे अग्निशामक दलाच्या गाड्या उभे राहतील.तसेच भोंगा असेल किंवा आपत्ती कालावधीत त्याचा उपयोग होईल, अशी यंत्रणा लावण्यात येणार अग्निशामक दलाच्या गाडीवर कार्यरत असलेले कर्मचारी निवास व्यवस्था असेल. जेणेकरून आपत्ती झाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाची गाडी रवाना होतील. भूसंपादित जागेवर मुख्याधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांना राहणेचा व्यवस्था केली जाणार आहे,असे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page