शेंडी पागण्याच्या स्पर्धेस मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.२९-: मालवण दांडी किनाऱ्यावर गाबीत महोत्सवानिमित्त आज सकाळी शेंडी पागणे या पारंपारिक मच्छिमारी पद्धतीची स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेस मालवण व देवगड तालुक्यातील मच्छिमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गाबीत महोत्सवाच्या निमित्ताने समुद्रात किनारी पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तांबळडेग, सर्जेकोट, वायरी, देवबाग, दांडी, तळाशील येथील स्पर्धक मच्छिमार बांधवांनी सहभाग घेत शेंडी पागण्याचे कौशल्य दाखविले. प्रथम वाळूत आखलेल्या वर्तुळात जाळे टाकणे व त्यानंतर समुद्रात जाळे टाकणे अशा दोन भागात ही स्पर्धा घेण्यात आली.

ही स्पर्धा बघण्यासाठी पर्यटक व स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. तर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही उपस्थिती दर्शवत मच्छिमारांच्या कौशल्याचे कौतुक केले.

You cannot copy content of this page