किर्लोस गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ

माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण व माजी उपसभापती राजू परुळेकर यांची उपस्थिती

⚡कणकवली ता.२२-: मालवण तालुक्यातील किर्लोस गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण,मालवण पंचायत समिती माजी उपसभापती राजू परुळेकर, किर्लोस गावच्या सरपंच सौ. साक्षी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळा लाड यांच्या उपस्थितीत पार पडला .

त्यावेळी किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रविण घाडीगावकर, भाजप बूथ अध्यक्ष भास्कर लाड, अभि लाड ,कृष्णा घाडीगावकर व अन्य भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पावणादेवी मंदिर येथे शौचालय बांधणे (रु 2 लाख.),
भास्कर लाड घरासमोरील गटार बांधणे (रु 70 हजार), जिल्हा वार्षिक योजनेतून किर्लोस आंबवणे रस्ता ग्रा. मा 119 खडीकरण व डांबरीकरण करणे (रु 10 लाख.),
25 / 15 योजनेतुन किर्लोस मुख्य रस्ता ते आंबवणे रस्ता करणे (रु 4 लाख),डोंगरी विकास योजनेतून किर्लोस चव्हाणवाडी रस्ता डांबरीकरण करणे (रु 5 लाख), जि.प शाळा किर्लोस भावेवाडी दुरुस्ती करणे (रु 2 लाख) या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. रविंद्र चव्हाण तसेच रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

You cannot copy content of this page