मोहिनी मडगावकर; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
⚡सावंतवाडी ता.२१-: येथील शहरातील मोती तलावाच्या बोट क्लबच्या कट्ट्यावरील सेल्फी पॉईटचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. सदर काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सावंतवाडी भाजप महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मडगावकर यांनी म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच काही ठिकाणी ग्रामीण भागातही सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु सावंतवाडी शहरातील एक वर्ष होऊन गेला तरी सेल्फी पॉइंटचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. तरी आपण जातीनेशी लक्ष घालून सदरचं काम नगरपरिषदेमार्फत पूर्ण करून घेण्यात यावी अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
यावेळी बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
