रस्त्याचे निकृष्ट सुरू असलेले काम ग्रामस्थांनी पाडले बंद

पुन्हा काम करण्याची मागणी

⚡आंबोली,ता.१७-: चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे निकृष्ट आणि अत्यंत बोगस काम करून शासनाच्या पैशाची लूटमार करणाऱ्या ठेकेदाराचे काम चौकुळ ग्रामस्थांनी बंद पडून दर्जाहीन केलेले काम पुन्हा करा अन्यथा ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चौकुळ येथील मुख्य रस्त्याचे काम आंबोली चौकुळ येथे दर्जाहीन आणि बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा देण्यात येत आहे. आंबोली फणसवाडी येथील पुलाचे देखील त्या ठेकेदाराने निकृष्ट काम केले होते आणि वाकडे तिकडे बांधले होते. त्यानंतर आता चौकुळ येथील रस्त्याचे काम करताना आधी चांगला असणाऱ्या रस्त्याची अक्षरशः वाट लावली आहे.डांबर न घालता मोठे खडीचे दगड मांडून ठेवले आहेत त्यावरून आता मोटार सायकल आणि गाड्या देखील घसरत आहेत.तर सकाळी सहा वाजता येऊन डांबर न घालता ठेकेदाराने खडी मांडून ओबडधोबड काम करून धूळ फेक केली आहे.सार्वजनिक बांधकाम चा एकही अधिकारी त्या ठिकाणी नाही.अशा प्रकारचे बोगस काम करून शासनाच्या पैशाची लूटमार करण्याचे धंदे ठेकेदार कडून होत आहे अधिकारी डोळ्यावर रुमाल बांधून मूग गिळून आहेत.ब्लॅक लिस्ट मध्ये ठेकेदाराला टाकून त्याने केलेले काम पुन्हा करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या ठिकाणी अशा प्रकारचे काम या विभागात अधिकारी खपवून घेतात कसे त्यामुळे ठेकेदार सोकावलेले आहेत लूटमार शासनाची करतात मात्र ग्रामस्थांना याचा कायमचा मनस्थाप होत आहे.या ठिकाणचे चौकुळ ग्रामस्थांनी काम बंद पाडले.या ठिकाणी पांडुरंग गावडे तुकाराम गावडे, विजय सावंत नितीन गावडे,सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे, संजू गावडे,अविल गावडे, समीर गावडे,निलेश गावडे,नंदू गावडे,बबन गावडे आदी ग्रामस्थांनी कामाची पोलखोल केली तसेच चुना लावणाऱ्या ठेकेदाराला चांगलाच फैलावर घेतले. रस्त्याचे काम चांगले न झाल्यास त्याला पाठीशी घालणाऱ्या नेत्याला देखील दणका देण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page