लोकवस्तीत घुसलेल्या हत्तींना पिटाळताना प्रेमानंद देसाई जखमी

एका हत्तीने पाठलाग केल्याने धावताना पडल्याने झाली दुखापत;केर येथील धक्कादायक घटना

⚡दोडामार्ग ता.१७-: केर येथे लोकवस्तीत घुसलेल्या हत्तींना पिटाळण्यासाठी गेलेले शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांच्यावरच रविवारी हत्तींनी हल्ला चढविला. पाच हत्तींपैकी एकाने त्यांचा पाठलाग केला यावेळी स्वतःचा बचाव करताना पडल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली असून म्हापसा गोवा येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

You cannot copy content of this page