धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मठात उद्यापासून कार्यक्रम

⚡मालवण ता.१६-:
मालवण धुरीवाडा (कुरण) येथील श्री स्वामी समर्थ मठात दि. १७ व १८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

यामध्ये दि. १७ रोजी सकाळी ७ ते १८ एप्रिल- रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अहोरात्र अखंड नामस्मरण, १८ रोजी सकाळी ७.३० ते ९ वा. कांकड आरती, भूपाळी, अभिषेक, पूजन. सकाळी ‘९.३० वा. ‘चरित्र सारामृत’ ग्रंथाची सामूहिक पारायणे, दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारनंतर त्रिमूर्ती भक्तिसंगम, मालवण यांचे गीतगायन, ह. भ. प. नामदेव महाराज करंगुटकर (गोवा) यांचे कीर्तन, भजन सद्गुरू सदानंद माऊली संप्रदाय, भजन मंडळ, वायरी- मालवण आदी कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहण्याचे, आवाहन श्री स्वामी समर्थ सेवेकरी धामापूरकर कुटुंबियांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page