मसुरे गावच्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला कै.राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्न पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.१५-: मसुरे गावची रहिवाशी कु.वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिची
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा कै. राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून उद्या दिनांक १६ एप्रिल रोजी ओम साई गणेश मंगल कार्यालय कट्टा येथे सदर पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री.राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी पंचायत समिती मालवण श्री आप्पासाहेब गुजर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, प्राथमिक शिक्षक भरती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे आणि विविध मान्यवर उपस्थित रहाणार आहेत नुकताच वैभवी हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान २०२३ हा राज्यस्तरीय पुरस्कार ठाणा येथे मिळाला होता.

वैभवी  पेडणेकर हीने आतापर्यंत तिला विविध तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच कराटे या क्रीडा प्रकारात तिने जिल्हा, राज्य, आंतरराज्य, स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केली आहेत. तिच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण या शिक्षण क्षेत्रातील  या संघटनेने घेऊन तिला सन २०२३  चा कै. राजेंद्र ठाकूर गुरुजी कलारत्न पुरस्कार जाहीर केला आहे  तिच्या या यशाबद्दल  सर्वत्र कौतुक होत आहे
You cannot copy content of this page