⚡मालवण ता.१४-: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई (जि. सिंधुदुर्ग) यांच्यातर्फे संत सेना महाराज जयंती उत्सवानिमित्त १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संत सेना महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने सकाळी ९ वा. दत्तमंदिर भरड ते मामा वरेरकर नाट्यगृहापर्यंत शोभायात्रा, सकाळी १०.३० वा. संत सेना महाराजांची प्रतिमा पूजन, सकाळी १०.४५ वा. महेश धामापूरकर यांचे कीर्तन, दुपारी १२.३० वा. मान्यवरांची भाषणे, १.३० वा. स्नेहभोजन, २ वा. हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम, ३ वा. जिल्हा कार्यकारिणीची बैठक, ५ वा. समारोप होणार आहे .यावेळी आचरा आणि नांदोस विभाग यांचा. दिंडी सोहळा खास आकर्षण असणार आहे
या कार्यक्रमास राज्य संघटक विजय सीताराम चव्हाण, सिंधुदुर्ग नाभिक मंडळाचे अध्यक्ष जगदिश चव्हाण, सचिव सुधीर चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, प्रवीण कुबल, तालुका सचिव चंद्रकांत चव्हाण, तालुका अध्यक्ष अॅड. भाऊ चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. या जयंती कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक महामंडळ आणि नाभिक बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
