⚡बांदा ता.१४-: डिंगणे येथील चोवीस खेड्यांचा अधिपती श्री पुरमार देवाचा १२ वा वर्धापनदिन सोहळा शनिवार १५ एप्रिल रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमित्त सकाळी ९ वाजता देवता अभ्यंगस्नान व पूजा, १० वा. अभिषेक, १०.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ वा. गार्हाणे व नवस फेडणे, १.३० वा. महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ वा. पासून स्थानिकांची भजने होतील.
रात्री ८ वा. श्री माऊली दशावतार मंडळ डिंगणे पुरस्कृत ‘लंगड्याची काठी आंधळ्याच्या हाती’ हा नाट्यप्रयोग होईल. यात बाबगो सावंत, विजय परब, जयराम भाणे, देवा राऊळ, कृष्णा देऊसकर, बाळा बांबर्डेकर व मुननकर यांच्या भूमिका आहेत. त्यांना हार्मोनियम प्रणित तेळेकर, पखवाज मुन्ना धुमक व झांज साथसंगत सुहास बांबर्डेकर करतील. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समिती व डिंगणे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
फोटो – श्री देव पुरमार
