कोकणातील अन्य नेत्याकडून दुजोरा; आंगणेवाडी सभेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांकडून दखल
⚡सावंतवाडी ता.१४ प्रसन्न गोंदावळे-: कोकणात वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपने आता रणनीती आखण्यात सुरुवात केली असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्याचं समजतं.
दरम्यान कोकणातील नेत्याने देखील याला तिजोरा दिलाय असून पक्ष बांधणी करणे व रणनीती आखणे ही जबाबदारी चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे.रवींद्र चव्हाण यांनी मालवणीतील आंगणेवाडी ची सभा यशस्वी करून दाखवल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली असून तसेच देवेंद्र फडणवीस यांचे एक जवळचे विश्वासू कार्यकर्ते असल्याने त्यांनाही जबाबदारी देण्यात आल्याचं वरिष्ठ भाजपकडून सांगण्यात आले.
