⚡सावंतवाडी ता.१४-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. भटवाडी शाळा नं. 6 मध्ये सावंतवाडी केंद्राच्या उत्साही, कार्यतत्पर, हरहुन्नरी गुणवत्तेचा ध्यास असणाऱ्या केंद्रप्रमुख सौ. स्नेहा लंगवे यांचा सेवानिवृत्ती निमित्त नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, शाळेच्या अध्यक्षा अनिशा राणे व उपाध्यक्ष समीक्षा खोचरे यांनी केंद्रप्रमुख स्नेहालंगवे मॅडम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मुलांचे अभिनंदन केले तसेच आपले मनोगत व्यक्त केले.
त्यावेळी माजी नगरसेविका सन्माननीय सौं. दिपाली भालेकर मॅडम, शिक्षणतज्ञ सन्माननीय श्री. दिलीप भालेकर सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सन्माननीय श्रीम. अनिशा राणे मॅडम, उपाध्यक्ष श्रीम. समीक्षा खोचरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, बालवाडी बाई सौं. दर्शना गावडे, मुख्याध्यापक श्रीम. सायली लांबर, शिक्षिका सौं. गीता सुतार यांच्या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.इयत्ता 4 थी तुन 5 वी मध्ये जाणाऱ्या मुलांना शुभेच्छा देण्यात आल्या.
STS व डॉ. ए. पी जे. अब्दुल कलाम परीक्षेत यश संपादन केलेल्या विदयार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
