⚡दोडामार्ग ता.१३-: शिरवल नदीवर न्हयखोल येथे आंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. अक्षय विष्णू कुलकर्णीकर (वय २०) असे त्याचे नाव असून मूळ राहणार ओल्ड गोवा येथील आहे. तर सध्या मणेरी येथे भाडेतत्त्वावर आई व भावा सोबत राहात होता. तालुक्यातील अन्य दोघेजन त्याच्यासोबत अंगोळीसाठी गेले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, मृत अक्षय व त्याचे दोडामार्ग तालुक्यातील दोन मित्र असे तिघेजण शिरवल गावातील नदीवर आंघोळीसाठी गेले होते. येथील नदीवर न्हायखोल सात बाय या ठिकाण ते अंगोळ करीत होते. तसेच हे ठिकाण पर्यटकांना ज्ञाय आहे. त्यामुळे अनेक पर्यटक येथे आंघोळ करण्यासाठी हजेरी लावतात. या ठिकाणी नदीपात्रात सात डोह आहेत. त्यातील एका डोहात हे तिघेही मित्रा अंगोल करीत होते. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्याने त्यातील दोघेजण जेवण करीत होते. तर अक्षय हा एकटाच त्या डोहात अंगोळ करीत जाता. दरम्यान खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो डोहात बुडाला. अक्षय जेवणासाठी बाहेर आला नसल्याने जेवत असलेल्या दोन्हीं मित्रांनी त्याचा शोध घेगला. परंतु तो दृष्टीस पडला नसल्याने त्या दोघांनीही ही बाब स्थानिकांना सांगितली. स्थानिकांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. पाच ते सहा जण नदीतील डोहात उतरले आणि बुडालेल्या अक्षयला बाहेर काढले. ही घटना पोलीस पाटील यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात कळविली. हवालदार अर्जुन गवस, पोलिस रामदास जाधव, समीर सुतार आदी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला.
अक्षय हा मूळ ओल्ड गोवा येथील आहे. तो आपल्या आई व भावा सोबत मणेरी येथे भाड्याच्या घरात राहत होता. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली.
न्हयखोल येथे आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
