आठवडा बाजार तलावाकाठीच योग्य…

हाॅकर्स संघटनेच्या बैठकीत राजकीय पदाधिकाऱ्यांचा सुर..

⚡सावंतवाडी ता.१२-: तलावाकाठीच आठवडा बाजार योग्य आहे असा एकसुर आज पार पडलेल्या हाॅकर्स संघटनेची बैठकीत राजकीय पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. सर्वांनी मते आठवडा बाजार हा तलावा काठीच योग्य आहे अस एकमत झाले.या बैठकीला काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान हाॅकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर,महेश परुळेकर,यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक श्रीराम वाचन मंदिर येथे पार पडली या बैठकीत सर्वानुमते सावंतवाडी तालुका हॉकर्स संघटनेची कार्यकारणी स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी अजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page