तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती
मालवण दि प्रतिनिधी
तालुक्यातील दोन सरपंचासह इतर सात जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायत बांदिवडे बुद्रुक, बांदिवडे खुर्द, आमडोस, खोटले, वराड, देवली, देऊळवाडा, तोंडवळी या ग्रामपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य थेट सरपंचांच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तालुक्यातील २ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तर इतर ७. सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यामुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्राच्या ठिकाणी भिंती रंगविणे, चित्र, बॅनर्स, पोस्टर, झेंडे काढून टाकावेत. याबाबत राज्य निवडणूक तसे न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची करवाई करण्यात यावी. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश तहसीलदार यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.
निवडणूक होणारे प्रभाग आणि ग्रामपंचायती – बांदिवडे बुद्रुक प्रभाग क्रमांक १ पदाचे नाव – सदस्य, आरक्षण – ना. मा. प्र. महिला. बांदिवडे खुर्द कोईल सरपंच, अनु. जाती. बांदिवडे खुर्द कोईल प्रभाग २, सदस्य, अनु. जाती महिला. बांदिवडे खुर्द कोईल प्रभाग ३, सदस्य, ना. मा. प्र. तोंडवळी प्रभाग १, सदस्य, ना. मा. प्र. आमडोस प्रभाग ३, सदस्य, ना. मा. प्र. महिला, खोटले प्रभाग १, सदस्य, ना. मा. प्र. महिला, वराड प्रभाग १, सदस्य, अनु. जमाती महिला, देवली प्रभाग २, सदस्य, अनु. जाती महिला, वायंगणी प्रभाग १, सदस्य, अनु. जाती, देऊळवाडा, सरपंच, ना. मा. प्र. महिला.
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक २५ एप्रिल ते २ मे पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३, दिनांक २९ एप्रिलचा शनिवार. ३० एप्रिलचा रविवार १ मेची. सार्वजनिक सुट्टी वगळून उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ ३ मे रोजी सकाळी ११ वा. पासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक ८ मे दुपारी ३ पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक ८ मे दुपारी ३ वा. नंतर आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक १८ मे सकाळी ७.३० पासून ते सायं. ५.३० वा. पर्यंत मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक १९ मे निश्चीत करण्यात आलेली आहे.
