आयुर्वेदीक महाविद्यालय व न्यायालयाच्या इमारतीबाबत वेधले लक्ष…
⚡सावंतवाडी ता.१२-: येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेडसावणाऱ्या प्रश्न तसेच न्यायालयाच्या प्रलंबित नूतन इमारती बांधणी संदर्भात पाठपुराव्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांची ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. दिलीप नार्वेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांनी दोघांकडून माहीती करुन घेतली.
