मणेरीतील घटना ; दुरुस्तीवरील खर्च पाण्यात
⚡दोडामार्ग ता.११ वैभव साळकर-: मणेरी येथे तिलारी प्रकल्पाचा पोटकालवा मंगळवारी पुन्हा फुटला. चार दिवसांपूर्वीच या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली होती.मात्र तरीही कालवा फुटल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
तिलारी प्रकल्प आणि कालवा फुटी तालुकावासियांसाठी आता काही नवीन राहिली नाही.दरवर्षी कुठे ना कुठे कालवा फुटल्याच्या बातम्या येत असतात.परंतु कालवा फुटीचे लागलेले ग्रहण सोडविण्यासाठी अधिकारी कायमस्वरूपी उपाययोजना करताना किंवा त्याची कारणमीमांसा करताना दिसत नाहीत.त्यामुळे वारंवार कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत.मंगळवारी तर चार दिवसांपूर्वीच दुरुस्ती केलेला पोटकालवा पुन्हा फुटला.त्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात मातीचा गाळ साचून नुकसान झाले .
