यापुढे वीर सावरकर यांचा अनुयायी म्हणून काम करणार

आ.नितेश राणे;कणकवलीत वीर सावरकर गौरव यात्रेला गर्दी; सावरकर यांचा आदर्श आम्ही विसरु शकणार नाही

⚡कणकवली ता.०५-: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर बोलणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी त्यांच्या आजीने काय सांगितले होते ते प्रथम पाहावे. माझे यापूर्वी वीर सावरकर यांच्याबाबत काही गैरसमज होते,तसे ट्विट मिळतील.काही विरोधक त्याची चर्चा करत आहेत. पण मला सावरकर यांच्याबद्दल चुकीची माहिती काहींनी दिल्यामुळे काही चुकीचा समज झाला होता.मात्र मी आता अभिमानाने सांगतो, यापुढे वीर सावरकर यांचा मी अनुयायी म्हणून काम करणार आहे. वीर सावरकर यांनी आपल्या जीवनात भोगलेला तुरुंगवास आणि त्यांनी निर्माण केलेले आदर्श आम्ही विसरु शकणार नाही असे प्रतिपादन आ.नितेश राणे यांनी केले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपा नेत्यांनी विधानसभा निहाय सावरकर गौरव यात्रा काढण्याचे ठरवले,त्यानुसार कणकवलीत मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी सहभागी झाले.
कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सावरकर गौरव यात्रा समारोप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी यात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजप सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,शहराध्यक्ष अण्णा कोदे, शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भाजपा तालुकध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, राजश्री धुमाळे, मनोज रावराणे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,सुरेश सावंत,डॉ.मिलिंद कुलकर्णी , भालचंद्र साठे,युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री,तालुका सरचिटणीस महेश गुरव ,बँक संचालक विठ्ठल देसाई, वैभववाडी नगराध्यक्ष स्नेहा माईनकर,तालुकाध्यक्ष नासीर काझी ,राजन चिके,संजना सदडेकर,मेघा गांगण,सुप्रिया नलावडे, हर्षदा वाळके, बाळ खडपे, संदीप साटम ,प्राची तावडे,देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,डॉ.अमोल तेली ,योगेश चांदोस्कर,रवी पाळेकर,प्रणाली माने आदीसह भाजपा व शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आ.नितेश राणे म्हणाले,ज्यावेळी आम्ही सरकार विरोधात आंदोलन केल्यामुळे अनेकदा आत टाकण्यात आले.आम्हाला ६ तास तुरुंगात राहताना कठीण होते.मात्र वीर सावरकर यांनी आपल्या जीवनात भोगलेल्या तुरुंगवास आणि त्यांनी निर्माण केलेलं आदर्श आम्ही विसरु शकणार नाही.त्या तुरुंगाच्या खोलीत सावरकर राहिले.देशाबद्दल योगदान दिले त्या वीर सावरकर यांच्या बद्दल राहुल गांधी यांनी माफी वीर बोलणं चुकीचे आहे.त्यांनी किमान स्वतःच्या आजीने सावरकर यांना काय म्हटलं,फिरोज गांधी यांनी म्हटलं ते वाचल्यानंतर राहुल गांधी तसे केव्हाच म्हणणार नाहीत.माफी या मुद्द्यावर मी गांधी आहे,सावरकर नाही,असे म्हणता तर मोदी विरोधात बोलला आणि शिक्षा झाली आहे.मग जामीन रद्द करुन तुरुंगवास भोगावा.
महाराष्ट्र राज्यात सावरकर गौरव यात्रा निमित्ताने जे वातावरण निर्माण झालं आहे.ते पाहून भाजपाच्या नेत्याचे आभार मानतो.तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील ही यात्रेत सहभाग घेतलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे म्हणाले,शिंदे फडणवीस सरकारने हिंदू काय आहे हे आज यातेतून दाखवून दिले आहे.सावरकर यांचा गौरव यात्रा आपल्या सर्वांच्या अभिमानाची आहे.

डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले, ब्रिटिशांनी सावरकर यांना ५० वर्षाची शिक्षा सुनावली. त्यांना ६ वर्षे कडक कोठडी सुनावली गेली , कुणालाही न भेटता रहावं लागलं.अनेक प्रकारची शिक्षा भोगावी लागली.१० वर्षे सक्त कारावास भोगावा लागला.त्याच्या कर्तुत्वाला ही यात्रा काढत न्याय देण्याचा प्रयत्न आ.नितेश राणे यांनी केला.हिंदुदुत्वाचा मुद्दा जिथे जिथे आला तिथे आ.नितेश राणे धावले.सावरकर हे विज्ञानवादी होते.राष्ट्रीय सुरक्षेसाठी दिलेले सल्ले सर्वच खरे ठरले आहेत.त्यांना वाचले पाहिजे,त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत.

वीर सावरकर लिखित बाजीप्रभू देशपांडे यांच्या वरील पोवाडा या यात्रेच्या प्रारंभी सादर करण्यात आला.कणकवली येथील पटकीदेवी मंदिर येथून “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला” आमदार नितेश राणे यांच्या नेतत्वाखालील काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने सावरकर प्रेमी यात्रे मध्ये सहभागी झाले आहेत. तर रत्नागिरी येथील शिवरूद्र ढोल पथकाने शानदार सलामी दिली आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील देखावे या यात्रेत दाखण्यात आले आहेत.जय श्रीराम, मी सावरकर अश्या जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.मी सावरकर लिहलेल्या टोप्या, शाली प्रत्येकाने घातल्या,त्यामुळे भगवे वातावरण निर्माण झाले होते.

You cannot copy content of this page