आवळेगाव येथील वणव्यात नुकसान झालेल्या कानसे कुटुंबियांना निलेश राणेंची आर्थिक मदत…

जखमी सत्यवान कानसे यांची केली विचारपूस

⚡ओरोस २६-: आवळेगाव-ओरोस खुर्द येथे काल लागलेल्या वणव्यात आवळेगाव फौजदारवाडी येथील शेतकरी सत्यवान गणपत कानसे यांच्या गोठ्याला आग लागून गोठा जळुन खाक झाला होता तसेच पाच जनावरे गंभीररित्या होरपळली होती तर त्यात एका म्हैशीचा मृत्यू झाला होता. ही बातमी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांना कळताच त्यांनी आज रविवारी आवळेगाव फौजदारवाडी येथे भेट देऊन कुटुंबियांची भेट घेत विचारपूस केली.

सध्या सिंधुदुर्गात आगीच्या वनव्यांचे प्रमाण वाढले आहे, यात वन्यप्राण्यांसह , पाळीव प्राण्यांच्या जीवितलाही धोका निर्माण झाला आहे. आवळेगाव येथील सत्यवान कानसे या शेतकऱ्याच्या गोठ्याला वनव्यामुळेच आग लागली होती या आगीत शेतकरी सत्यवान कानसे यांच्या पाच म्हशी पूर्णपणे होरपळल्या होत्या, तर एका म्हैसीचाही मृत्यू झाला होता. या म्हशींना वाचवण्याच्या प्रयत्नात सत्यवान कानसे ही जखमी झाले होते. गोठा ही जळून खास झाला होता. याबाबत माहिती मिळताच भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आवळेगाव येथे कानसे कुटुंबियांची भेट घेत त्यांची विचारपूस करत त्यांना आर्थिक मदतही केली. तर यावेळी आपणास कोणतीही मदत लागल्यास सांगा तसेच शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याकरिता आपण स्वतः उच्चस्तरावरून पाठपुरावा करण्याचा शब्द दिला. यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष पप्या टवटे, आवळेगाव सरपंच पूर्वा सावंत, शक्तिकेंद्र प्रमुख अमित तावडे, मनोरंजन सावंत, महेश तावडे, राजेंद्र सावंत, चंदू सावंत, तुषार सावंत, विघ्नेश घाडी, कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page