मालवण काँग्रेसने घोषणा, काळया फिती लावून केला निषेध

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याने भाजप विरोधात केले आंदोलन

मालवण दि प्रतिनिधी

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने सूनावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेचा आधार घेऊन त्यांची खासदारकी रद्द करणाऱ्या मोदी सरकार आणि भाजपचा आज मालवण फोवकांडा पिंपळ येथे मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून व जोरदार घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ” राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है”. “भ्रष्टाचारी भाजप सरकारचा निषेध असो” , ‘नही चलेगी नही चलेगी… मोदी सरकार की दादागिरी नही चलेगी” . या आणि अशा विविध घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सारा आसमंत दुमदुमून सोडला.

यावेळी काँगेसच्या पदाधिकाऱ्यांनी हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजप राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि याचाच आधार घेत आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून या देशातील लोकशाहीचा अंत मोदी सरकारने केल्याचा आरोपही यावेळी केला .

यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, अरविंद मोडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, शहर चिटणीस श्रेयस माणगावकर, लक्ष्मीकांत परुळेकर, देवानंद लुडबे, किशोर नाचणोलकर, संदीप परब, पराग माणगावकर, मेघः श्याम लुडबे, उपाध्यक्ष हेमंत माळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, लुईस मेंडीस, मधुकर लुडबे, योगेश्वर कुर्ले, आप्पा चव्हाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सरदार ताजर, समीर आगणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page