⚡मालवण ता.२१-: महाराष्ट्र नाभिक महामंडळ मालवण तालुका नाभिक संघटनेची बैठक दि. २७ रोजी भैरवी देवालय मालवण येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण, जिल्हा अध्यक्ष जगदीश चव्हाण, जिल्हा महिला अध्यक्ष प्रतिभा चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष भाऊ चव्हाण तालुका महिला अध्यक्ष दीपा शिंदे, सर्व तालुका कार्यकारिणी, विभाग प्रमुख, गट प्रमुख, पदाधिकारी, उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संतसेना महाराज जयंती साजरी करण्याबद्दल चर्चा करणे, नवीन कार्यकरणीच्या विभागवार बैठका लावणे आदी विषयांवर प्रांत संघटक विजय चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण यांनी केले आहे.