वेत्येत आंबा – काजू बागेला आग ;

सायंकाळची घटना; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान;

⚡सावंतवाडी ता.२१-: वेत्ये येथील काजू व आंबा बागायतीला आग लागल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला देखील पाचरण केले.

घटनास्थळी बंब देखील दाखल झाला. आग विजेच्या शॉर्ट सर्किट होऊन लागल्याचं प्राथमिक अंदाज असून यात तीन ते चार शेतकऱ्यांचा देखील मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या शॉर्ट सर्किट ने आग लागल्याने वेत्ये सरपंच गुणजी गावडे यांनी नाराजी व्यक्त केली.

You cannot copy content of this page