⚡वेंगुर्ला ता.२०-: पाट येथील सिधू संजिवनी ग्रुप व बी.के.एल.वालावलकर क्षेत्र डेरवण हॉस्पिटल यांच्यावतीने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे २२२ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरासाठी आमदार वैभव नाईक यांनी औषध साठा उपलब्ध करुन दिला.
नेत्ररोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, जनरल मेडिसीन तज्ज्ञ, जनरल सर्जरी तज्ज्ञ इत्यादी डॉक्टरांच्या आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांनी घेतला. रणजित देसाई व संजय वेंगुर्लेकर यांनी या उपक्रमास भेट देऊन आर्थिक मदतही केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी नारायण साटम, निखिल माधव, महेश वेळकर, गणेश माधव, सचिन धुमाळ, शेखर मराळ, विठ्ठल माधव, गिरीप्रसाद राऊळ, अॅड.रुपेश देसाई आणि डॉ.भारतेंदु आवळे, सिद्धी पारकर यांनी मेहनत घेतली.
पाट येथे २२२ रुग्णांची आरोग्य तपासणी
