गुढीपाडव्यानिमित्त मनपसंत दुचाकीची चावी मिळणार हातीत

कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची विशेष सवलत देणारी योजना;20 ते 22 मार्च कालावधीत एकाच ठिकाणी कोणत्याही कंपनीची दुचाकी खरेदी करण्याची संधी

⚡सावंतवाडी ता.१८-: कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी सावंतवाडीच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने 20 ते 22 मार्च 2023 या कालावधीत सावंतवाडी येथील गांधी चौक नजीक केसरकर कॉम्प्लेक्स येथे भव्य दुचाकी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विविध कंपन्यांच्या गाड्या एकाच ठिकाणी पहावयास मिळणार आहेत. यासाठी कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने कॅथलिक टू व्हीलर लोन ही योजना आणली आहे. प्रति एक हजार रुपया मागे केवळ 27 रुपये इ एम आय भरून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोटेशनच्या 90 टक्के पर्यंत लोन उपलब्ध करून देण्यात येणार असून पगारदार व्यक्तींसाठी शंभर टक्के लोन देण्यात येणार आहे.

कमीत कमी कागदपत्रात त्वरित लोन देण्याची व्यवस्था कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या आवडीची दुचाकी घरी नेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

You cannot copy content of this page