फाऊंडेशन कडून सर्व व्यवस्था…मात्र पोलिस यंत्रणा अलर्ट..
⚡कुडाळ ता १८-: माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठे “शिवगर्जना” या महानाट्याला पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी उसळली, आज व उद्या दोन्ही दिवशी अशीच गर्दी उरणार असून कुडाळ पोलिसांकडूनही याची दखल घेत आपली यंत्रणा अलर्ट ठेवली आहे. मात्र सर्वाना हे महानाट्य पाहता यावे याबाबत फाऊंडेशन कडून संपुर्ण प्रयत्न केले जात असल्याचे उद्योजक तथा भाजपा युवा नेते विशाल परब यांनी सांगितले.
कुडाळ येथील आगाराच्या मैदानावर हे महानाट्य होत असून पहिल्याच दिवशी शिवप्रेमी व निलेश राणे प्रेमीनी छत्रपतींचा इतिहास डोळे भरुन पाहील, शिवराज्याभिषेक,हत्ती ,घोडे,
पोवाडे व ऐतिहासिक प्रसंग पाहून रसिक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येकानी टाळ्यांच्या कडकडाट करत प्रत्येक कलाकारांला त्याच्या कलेची दाद दिली. हे महानाट्य मोफत उपलब्ध करुन दिल्याबद्दल विशाल परब व राणे कुटुंबियांचे आभार व्यक्त केले. पहिल्याच दिवशी झालेली गर्दी पाहता आज व उद्या महानाट्याला गर्दी होणार आहे. त्यामुळेच पोलिस यंत्रणाही अलर्ट झाली आहे. दोन्ही दिवस फाऊंडेशन शिवप्रेमी व निलेश राणे प्रेमी याचे योग्य सोय करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहेत.
