मालवण दि प्रतिनिधी
मालवण चिवला बीच येथील रहिवाशी आणि भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. ज्यूली जॉन फर्नांडिस (वय ६०) यांचे गुरुवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
मालवण येथील भंडारी हायस्कुलच्या सेवानिवृत्त शिक्षिका ज्यूली फर्नांडिस या विध्यार्थी प्रिय शिक्षिका होत्या. मराठी, विज्ञान विषय शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता. पूर्वाश्रमीच्या हिलोरीन जुजे चोडणेकर म्हणजेच ज्यूली फर्नांडिस यांचे माहेर कणकवली नाटळ येथे होते. नाटळ हायस्कुल मध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून एक वर्ष सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांनी ३२ वर्ष भंडारी हायस्कुल मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून काम केले.भंडारी हायस्कूल मधून दोन वर्षापूर्वीच त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. चार दिवसापूर्वी त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना मालवणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. टोपीवाला हायस्कुलचे सेवानिवृत्त कर्मचारी जॉन फर्नांडिस यांच्या त्या पत्नी होत. आज सायंकाळी रोझरी चर्च नजीकच्या दफन भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
