वाढविण्यासाठी आलेल्या रक्त पिशवीची किंमत सर्वसामान्यांना न परवडणारी

सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठानचे मत;
दरवाढ स्थगित करण्याचीही केली मागणी

मालवण : (प्रतिनिधी)

शासनाच्या नव्या निर्णयानुसार खासगी रुग्णालयात उपचार घेताना आवश्यक असणाऱ्या रक्त पिशवीची किंमत वाढविण्यात आली असून ही दरवाढ सामान्य रुग्णांना परवडणारी नाही. त्यामुळेच रक्त पिशवी किंमत वाढ प्रश्नी सिंधुदुर्ग रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक भावनेतून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात येत असून रक्त पिशवीची वाढीव दरवाढ स्थगित करावी, अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन राज्यशासन प्रशासकीय प्रतिनिधी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण अध्यक्षा सौ. शिल्पा यतीन खोत, जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, तालुका उपाध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक, हर्षदा पडवळ, साक्षी मयेकर, आर्या गांवकर, शांती तोंडवळकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापन रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार शासकीय रुग्णालयात दाखल असणाऱ्या व रक्ताची गरज लागणाऱ्या सर्व रुग्णांना आता रक्त पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. हे स्वागतार्ह्य असून यामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र याचवेळी शासनाने घेतलेल्या दुसऱ्या निर्णया प्रमाणे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्त पिशवी रुपये ४५०/- वरुन रुपये ११००/- इतकी दरवाढ केली आहे. अनेकवेळा काही सेवा या शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत. अशावेळी खाजगी रुग्णालयातच नाईलाजाने रुग्णांवर उपचार केले जातात. जर रक्ताची गरज लागली तर या सुधारीत दराने सामान्य व गरिब रुग्णास रक्त घ्यावे लागेल. परंतु खाजगी रुग्णालयात जाणाऱ्या सामान्य व गरिब रुग्णांना ही दरवाढ परवडणारी नाहीय, त्यामुळे ही नवीन दरवाढ रद्द करुन जुन्या धोरणा प्रमाणेच ती ४५०/- रुपये अशी ठेवावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

खेड्यापाड्यातील सामान्य व गरिब जनता नाईलाजाने किंवा अपरिहार्यपणे खाजगीत उपचार घेत आहेत, रक्ताचे शुल्क वाढवल्यामुळे हा अधिकचा भुर्दंड या जनतेस पडणार आहे. त्यामुळेच याकडे अत्यंत संवेदनशीलतेने शासनाचा लक्षवेध करावा, तसेच सुधारीत वाढीव सेवाशुल्काबाबत स्थगिती देऊन ती खाजगी करिता पूर्ववत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वतीने करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page