वेंगुर्ल्यात दिव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड शिबिराचे अयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आणि सिधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती संस्थेच्यावतीने १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला येथे दिव्यांग प्रमाणपत्र व स्वावलंबन कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे. यासाठी दिव्यांगांनी आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये किवा ‘आपले सेवा केंद्र‘ येथे जाऊन स्वावलंबन पोर्टलवर आपली ऑनलाईन नोंदणी करावी. या नोंदणीसाठी आधार कार्ड, रेशनकार्ड, जुने अपंग प्रमाणपत्र असेल तर, अस्तिव्यंग असेल चार बाय सहाचा फुल साईज फोटो, उर्वरित दिव्यांगांनी पासपोर्ट फोटो, शाळेचा किवा जन्माचा दाखला नेणे आवश्यक आहे.

You cannot copy content of this page