दळवी महाविद्यालयात ‘गीत-वीर-विनायक’ संगीतमय कार्यक्रमास प्रतिसाद

⚡कणकवली ता.१६-: तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयात सतीश भिडे ‘गीत-वीर-विनायक’ संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सतीश भिडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगावर निवेदन करून गाणी सादर केली.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलीत करून झाली. माजी मानद महानिर्देशक विनायक दळवी यांनी शब्दबद्ध केलेले महाविद्यालय गीत विद्यार्थ्यांनी गायले. वरिष्ठ सहा. प्राध्यापक हेमंत महाडिक , यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले कि, “संत ज्ञानेश्वरानंतर जर अत्युच्च कवी कोण असतील तर ते म्हणजे, विर सावरकर ”. अखंड भारत निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान खूप मोठे आहे. श्री. सतीश भिडे यांच्या ‘गीत-वीर-विनायक’ या संगीतमय कार्यक्रमाचे २२३९ प्रयोग देश व परदेशात झाले आहेत. मुंबई आकाशवाणी व दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. ‘अखंड भारत कर के रहेंगे’ या घोषणेने कार्यक्रमाचे समापन झाले.
कार्यक्रमात आयुष घाडी व दिवेश कदम यांनी तबला व डोलकी वाजवून सोबत दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पत्रकार परेश राऊत यांची मदत झाली. या वेळी यावेळी महाविद्यालयातील विद्याथी,शिक्षक-शिक्षकेत्तरवर्ग उपस्थित होता.

You cannot copy content of this page