माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी
⚡सावंतवाडी ता.१६-: येथील मोती तलावाच्या फुटपाथवर फ्लेवर ब्लॉकचे काम सुरू आहे. तसेच त्या भागाचे सिमेंट काम सुरू आहे. मात्र, त्यावर पाण्याचा वापर केलेला दिसत नाही. त्यामुळे सदरचा फुटपाथ जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे नगर परिषदेत तात्काळ दखल घेऊन “त्या” ठिकाणी केलेल्या कामावर दररोज पाणी मारण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केले असून त्यांनी याबाबत नगरपरिषदेचे लक्ष देखील वेधले आहे.
