⚡कणकवली ता.१६-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संत रोहिदास महाराजांच्या नावे राज्यस्तरीय रोहिदासरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
चर्मकार समाजातील वेक्तिनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला – क्रीडा, सहकार, साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वेक्तिना दरवर्षी सात मानाचे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. वरील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चर्मकार समाजातील वेक्तिनीच आपल्या कामाचे प्रस्ताव २४ फेब्रुवारीपर्यंत प्रसाद नारायण मसुरकर, सहाय्यक शिक्षक, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत. आलेल्या प्रस्तावामधून पुरस्कार निवड समिती छाननी करून पुरस्कारप्राप्त व्यक्तींची नावे फोटोसह वर्तमानपत्रातून प्रसिद्धीस दिली जातील तसेच पुरस्कारप्राप्त व्यक्तीना रीतसर निवडपत्र पाठविले जाईल. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रम संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनी ५ मार्च २०२३ रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे होईल.अधिक माहितीसाठी पुरस्कार निवडसमिती प्रमुख प्रसाद मसुरकर( ९४०५२१३४३० )या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
