⚡कणकवली ता.१६-: शिवजयंती निमित्तछत्रपती शिवजयंती उत्सव समिती, कलमठच्या वतीने रविवार १९ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा दोन गटात होणार आहे.
या स्पर्धा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहेत. या २ गटात होणार आहे. ह्यामध्ये इयत्ता १ली ते ४थी व ५ वी ते ७ वी असे दोन गट करण्यात आले आहेत. या वकृत्व स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत.१) छ.शिवाजी महाराजांचे स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग.२) शिवाजी महाराजांचे व्यापारी किंवा शेतीविषयक धोरण.३) शिवाजी महाराजांचा इतिहास.
१ ली ते ४ थी ह्या गटास अनुक्रमे
प्रथम पारितोषिक १००१/- रोख व प्रशस्तीपत्र
द्वितीय पारितोषिक ७०१/- रोख व प्रशस्तीपत्र
तृतीय पारितोषिक ५०१/- रोख व प्रशस्तीपत्र
तसेच ५ वी ते ७ वी या गटास
प्रथम पारितोषिक १५०१/- रोख व प्रशस्तीपत्र
द्वितीय पारितोषिक १००१/- रोख व प्रशस्तीपत्र
तृतीय पारितोषिक ७०१/- रोख व प्रशस्तीपत्र.तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.ही स्पर्धा कलमठ बाजार पेठ येथील माणिक चौक (मांड ) येथे होणार आहे.
अधिक माहिती साठी सुशांत राऊळ ९४०५७८१२९६,धिरज मेस्त्री ८८०५८३१२८१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
कलमठ येथे १९ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा
