व्यापारी एकता मेळाव्याला उत्साहात प्रारंभ

रघुवीर उर्फ भाई मंत्री यांच्याहस्ते झाले उद्घाटन

⚡वेंगुर्ले ता.३१-: जिल्हा व्यापारी संघाच्यावतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या एकता मेळाव्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. या मेळाव्याचे उद्घाटन रघुवीर ऊर्फ भाई मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यापीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दाशरथी, चार्टर्ड अकाऊंट सुनिल सौदागर, जीएसटी कौन्सिल सदस्य उमेश शर्मा,अध्यक्ष महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना तथा वीज नियामक आयोग प्रताप होगाडे , सचिन निवंगुडे, जिल्हा महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा महासंघ कार्यवाह नितीन वाळके, सहकार्यवाह राजेश जठार, माजी आमदार राजन तेली, आनंदी रासम, संतोष कापडे, राजन नाईक, नंदन वेंगुर्लेकर, द्वारकानाथ घुर्यें, प्रमोद नलावडे, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विवेक खानोलकर, कार्यवाह राजेश शिरसाट, राजन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page