वैभववाडीच्या विकासासाठी काँग्रेसला साथ द्या

सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी : तालुकाध्यक्ष प्रांजली जाधव यांच्या माध्यमातून हळदीकुंकू समारंभ

⚡वैभवावडी ता.३१-: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने एक इतिहास घडवला आहे. जर त्यांचे नेतृत्व पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना साथ द्या अशी हाक काँग्रेस सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी दिली.

वैभवाडी येथे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रांजली जाधव यांच्या माध्यमातून काँग्रेस हात से हात जोडो हळदीकुकू समारंभ कार्यक्रम प्रसंगी श्रीमती वंजारी बोलत होत्या. यावेळी त्यांनी लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. त्या पुढे म्हणाले की वैभववाडी तालुक्याचा विकास हवा तसा झालेला नाही. रस्ते, वीज सारख्या मूलभूत सुविधा सुद्धा नाहीत त्यामुळे परिवर्तन हवे असेल तर येणाऱ्या काळात काँग्रेसच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन ही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान वैभववडीच्या विकासात कोणतीही प्रगती नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

You cannot copy content of this page