सोनाळी येथे बिबट्या च्या हल्ल्यात गाय ठार….

*💫वैभववाडी दि.१२-:* :सोनाळी येथील जंगलमय भागात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. शेतकरी संजय सहदेव शिंदे रा.सोनाळी तळेकरवाडी यांचे सुमारे 10 हजारांचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेले दोन – तीन महिन्यात अनेक पाळीव जनावरे ठार मारली आहेत.तर अनेक जनावरांना जखमी केले आहे.वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून भरपाई दिलेली नाही.शेतकरी नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहेत. या घटनेचा पंचनामा वैभववाडी वनपरिक्षेत्र चे वनपाल एस.एस.वाघरे,वनरक्षक अमीर काकतीकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

You cannot copy content of this page