सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते आयोजन*
सिंधुदुर्गनगरी ता १२ माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त आज शुक्रवारी कसाल येथील श्री.सिध्दिविनायक मंदीराचा सभागृहात मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. यावेळी रक्तदात्यांना लकी ड्रॉ प्रमाणे पाच हेल्मेट व दहा मोबाईल हेडफोन असेही वाटप करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमाचे उद्घाटन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.नविन अशोक बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. व मंदिरातील पुजारी श्री.पोखरणकर गुरूजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली. या वेळी मंडळाच्या रक्तदान शिबीराचे ८वे वर्ष आहे. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुरक्त मित्र या संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश तेंडोलकर व सचिव श्री .किशोर नाचलोनकर हे उपस्थित होते. सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या रक्तदान शिबीराचे हे ८ वे वर्ष असून यावेळी ४१ रक्तदात्यांंनी सहभाग घेत रक्तदानाचा हक्क बजावला .रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून युवा मित्र मंडळाने हे रक्तदान केले.सर्व रक्तदात्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व ४१ रक्तदात्यांची नावे लकी ड्रॉ प्रमाणे काडुन ५ रक्तदात्यांना हेल्मेट व १० रक्तदात्यांना मोबाईल हेडफोन चे बक्षिस म्हणून वाटप करण्यात आले . या वेळी सिंधुदुर्ग रक्तपेढीतील डाॅ.राजेश पालव तसेच सर्व रक्तपेढीतील कर्मचारी श्री.सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मित्र मंडळाचे कार्यकर्ते,पदाधिकारी व पत्रकार बंधु उपस्थित होते. यावेळी अनिल पावसकर ,नवीन बांदेकर अवधूत मालवणकर, प्रकाश नारकर सर ,साईनाथ आंबेरकर, बाळा कांदळकर, वैभव बांदेकर, राजू नारकर, आबा तवटे,श्रीनिवास कांदळकर, आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.