⚡वेंगुर्ले ता.२२-: जिल्ह्यात आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या न्यू इग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चमकदार कामगिरीचे दर्शन घडवत वेंगुर्ले नगरवाचनालयात संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवत आपल्या विद्यालयाची परंपरा कायम राखली करोना नंतरचे जग या विषयावर भाष्य करत या विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थी कु.अमेश प्रशांत आरोलकर यांने तृतीय क्रमांक पटकावला.
तरया प्रशालेचा कु. दिपेश जयराम वराडकर याने ” ई चलन” या विषयावर बोलताना या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवत बाजी मारली सदर स्पर्धा नववी ते बारावी या गटात घेण्यात आली.
या दोन्ही ही यशस्वी विद्यार्थ्यांना या प्रशालेचे अध्यापक श्री वैभव खानोलकर सर आणि श्री अजित केरकर यांनी मार्गदर्शन केले,
या उल्लेखनीय यशा बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.वाळवेकर सर संस्था अध्यक्ष श्री विरेंद्र कामत आडारकर सुप्रसिद्ध रांगोळीकार आणि विद्यमान सचिव रमेश नरसुले माजी गटशिक्षण अधिकारी आणि विद्यमान उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर या सह सर्व संस्था पदाधिकारी यांनु यशप्राप्त विद्यार्थी आणि मार्गदर्शक श्री खानोलकर सर आणि अजित केरकर याचे ही अभिनंदन केले.
वक्तृत्व स्पर्धेत या विद्यालयाला मिळालेले या उल्लेखनीय आणि सातत्यपुर्ण यशा बद्दल या सर्व स्तरातुन कौतुक होत आहे
