न्यू इग्लिश स्कुल उभादांडा वेंगुर्ला प्रशालेच्या स्नेहा वेंगुर्लेकरचे कथाकथन मध्ये यश

⚡वेंगुर्ला ता.२२-: मळगाव येथे उदय रमांकात खानोलकर वाचन मंदिरात आयोजित केलेल्या प्रा.रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत मोठ्या गटात न्यु इग्लिश स्कूल उंभादाडा विद्यालयांची विद्यार्थीनी कु.स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर हिने तृतीय क्रमांक मिळवत यश मिळवले.स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर हि आठवी इयत्तेत शिकणारी विद्यार्थीनी असुन तीला या स्पर्धेसाठी या प्रशालेचे उपक्रमशील अध्यापक प्रा.वैभव खानोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केले तसेच अजित केरकर यांचे हि मार्गदर्शन लाभले.

या कथाकथन स्पर्धेतील उल्लेखनीय यशा बद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.वाळवेकर सर संस्था अध्यक्ष श्री विरेंद्र कामत आडारकर, सुप्रसिद्ध रांगोळीकार आणि विद्यमान सचिव रमेश नरसुले, माजी गटशिक्षण अधिकारी आणि विद्यमान उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर या सह सर्व संस्था पदाधिकारी यांनु यशप्राप्त विद्यार्थी आणि मार्गदर्शक श्री खानोलकर सर आणि अजित केरकर याचे ही अभिनंदन केले.स्नेहा वेंगुर्लेकर हिला मिळालेले या उल्लेखनीय यशा बद्दल या सर्व स्तरातुन कौतुक होत आहे

You cannot copy content of this page