केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी टॉवर केला आहे मंजूर
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कुडोपी गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे समस्यांचा सामना करावा लागत होता. या गावचे माजी सरपंच तुषार पाटणकर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून या गावासाठी बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर झाला आहे. भारत दुरसंचार निगम चे केवडे आणी श्रावण मंडळ अधिकारी पवार यांनी कुडोपी देऊळवाडी येथे भेट देवून टावरसाठी जागा निश्चिती बाबत पहाणी केली.
यावेळी त्यांच्या सोबत माजी सरपंच तुषार पाटणकर विद्यमान ग्रा प सदस्य प्रशांत पडवळ उर्फ बंड्या पडवळ यांसह अनृय ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या टॉवर मुळे कुडोपी गाव ,बुधवले गाव ,खुडी कोल्हे ढवळ वाडी ,खुडीपाठ ,मळैशेत वाडी, या दुर्गम भागातील गावांना फायदा होणार आहे.
